‘कमोड’वर श्री गणेशाचे चित्र छापणार्‍या ‘इट्सी’ आस्थापनाचा हिंदूंकडून निषेध

‘कमोड’ची विक्री थांबवण्याची मागणी

कमोडच्या झाकणावर छापण्यात आलेले श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र

हे चित्र छापण्यामागे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून त्यांना विडंबन कळण्यासाठी चित्र छापण्यात आले आहे.

नेवाडा (अमेरिका) – न्यूयॉर्क येथे मुख्यालय असलेल्या ‘इट्सी’ या ‘ऑनलाईन’ विक्री करणार्‍या आस्थापनाने श्री गणेशाचे चित्र असलेल्या ‘कमोड’ची (टॉयलेट सीटची)  विक्री चालवली आहे.‘इट्सी’ने श्री गणेशाला ‘बाथरूम गणेश’ असे संबोधले आहे.  कमोडच्या झाकणावर छापलेल्या श्री गणेशाच्या हातामध्ये कंगवा, आरसा, टूथब्रश आणि टूथपेस्ट दाखवण्यात आली आहे. तसेच श्री गणेशाचे वाहन असलेल्या उंदराला कंगव्याच्या रूपात दाखवण्यात आले आहे. जगभरातील हिंदूंनी याचा तीव्र विरोध करून त्याची विक्री त्वरित थांबवून आस्थापनाला हिंदूंची क्षमा मागण्यास सांगितले आहे.


Multi Language |Offline reading | PDF