अवैध मशिदींच्या विरोधात कारवाई करण्याविषयीचा व्हॉट्स अ‍ॅपवर प्रसारित झालेला व्हिडिओ पाहून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याकडे आक्षेप नोंदवणारे धर्मांध

किती हिंदू स्वतःच्या श्रद्धास्थानांविषयी असे जागरूक असतात ?

अवैध मशिदींवर कारवाई करण्याच्या संदर्भात व्हॉट्स अ‍ॅपवर एक व्हिडिओ (चलतचित्र) प्रसारित करण्यात झाला होता. या व्हिडिओमध्ये हिंदु जनजागृती समितीचा एक संपर्क क्रमांक होता. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिलेल्या काही धर्मांधांनी या क्रमांकावर संपर्क करून समितीच्या कार्यकर्त्याकडे आक्षेप नोंदवला. यात विदेशातूनही एका धर्मांधाने कार्यकर्त्याला संपर्क करून धमकावले.

हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित (व्हायरल) झाला होता. त्यामुळे धर्मांधांचे अशा प्रकारे पहिल्या दिवशी ८ दूरभाष आले आणि दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत २ दूरभाष आले. हे धर्मांध स्वतः हिंदु असल्याचे खोटे सांगून माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. यातील काही जणांनी नंतर त्यांचे खरे नाव सांगितले. यावरून लक्षात येते की, धर्मांध हे धर्मासाठी काहीही करण्यास सिद्ध असतात.

१. हिंदु जनजागृती समितीच्या हेतूविषयी आक्षेप घेणारा धर्मांध !

धर्मांध : मी — येथून बोलत आहे. माझ्याकडे मशिदीविषयी एक व्हिडिओ आलेला आहे, त्यावर हा क्रमांक आहे; म्हणून मी संपर्क करत आहे. हिंदु जनजागृती समितीचा हा क्रमांक आहे. यामागे हिंदु जनजागृती समितीचा काय हेतू आहे ? आपण वर्षानुवर्षे एकत्र रहात आहोत. काही शतके गेली आहेत; मात्र आता व्हिडिओमध्ये तुम्ही सांगत आहात, मशिदीला कसे तोडावे ? यात तुम्ही म्हणता, रमजानमध्ये रोज प्रार्थना करतात. गणपतीच्या दिवसांत तुम्ही ९ दिवस प्रार्थना करत नाही का ?

कार्यकर्ता : सर्वोच्च न्यायालयानेे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे वाजवू नयेत, असा आदेश दिला आहे. तरीही तुम्ही ज्या भागात रहाता, तेथे पहाटे ५ वाजता भोंग्याचा आवाज का होतो ? हे कुराणामध्ये लिहिले आहे का ? तेव्हा भोंग्याचा शोध लागला होता का ? तरीही तुम्ही असे का करता ? याचे मला प्रथम उत्तर द्या.

धर्मांध : तुमचे म्हणणे मान्य आहे. त्या वेळी भोंगे नव्हते. भोंग्यांचा नियम तुम्हाला आणि आम्हाला दोघांनाही लागू आहे.कार्यकर्ता : यासाठी आम्ही जे योग्य आहे, त्याला योग्य म्हणतो आणि जे चुकीचे आहे, त्याला चुकीचे म्हणतो.

धर्मांध : ते माणसाच्या विचारावर अवलंबून असते. कार्यकर्ता : तुम्ही माझ्या प्रश्‍नाला उत्तर दिले नाही. मला उगीच चर्चा करायला वेळ नाही.

अशाच प्रकारे मशिदींवरील भोंग्यांविषयीच्या व्हिडिओवर आक्षेप घेणारे दूरभाष अन्य काही धर्मांधांकडून आले होते; मात्र एकाही हिंंदूने अवैध मशिदींविषयीच्या या व्हिडिओच्या समर्थनार्थ संपर्क केला नाही.

२. एका धर्मांधाने विदेशातून संपर्क करत प्रथम स्वतः हिंदु असल्याचे सांगणे आणि नंतर त्याने खरी ओळख सांगणे

विदेशातून एका धर्मांध व्यक्तीने प्रथम स्वतः हिंदु असल्याचे सांगून संपर्क केला. या व्यक्तीशी संभाषण चालू असतांना ती धर्मांध असल्याचे समजले. ही व्यक्ती इंग्रजीमध्ये बोलत होती. अधून मधून शिव्या देत होती, तसेच फार उद्धटपणे बोलत होती. या वेळी या धर्मांधाचे समितीच्या कार्यकर्त्याशी झालेले संभाषण येथे देत आहोत.

धर्मांध : माझे नाव अश्‍वीन आहे आणि मी विदेशातून बोलत आहे. मशिदीवरून भारतात काय गोंधळ चालला आहे ?

कार्यकर्ता : काही ठिकाणी मशिदीत अवैध कामे चालतात, असे कळते.

धर्मांध : मशिदी अवैध आहेत, तर अवैध मंदिरांचे काय ? अवैध मंदिरांवर का कारवाई केली नाही ?

कार्यकर्ता : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहस्रो मंदिरे पाडली आहेत; मात्र अवैध मशिदी किंवा दर्गे तोडले जात नाहीत.

धर्मांध : हे अकस्मात कसे काय चालू झाले ?

कार्यकर्ता : हे अकस्मात झाले नसून शेकडो वर्षांपासून चालू आहे. वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये साडेचार लाख हिंदूंना हाकलून दिले, ९३ सहस्र हिंदूंची कत्तल केली, हे असेच चालू आहे.

धर्मांध (शिव्या देत धमकी दिली) : मी दूर आहे, नाहीतर सर्वांना मारून टाकले असते. तुम्ही शांततेत का रहात नाही ? वेड्यासारखे का वागता ?

कार्यकर्ता : काही देशद्रोही आणि आतंकवादी यांच्यामुळे शांतता नाही.

धर्मांध : वन्दे मातरम् वगैरे काय चालले आहे ? मी भारतात वाढलो. केवळ इंडियन म्हटले की झाले. मी इंडियाचा एक भाग आहे. मुसलमानांना बाहेर काढा, मशीद तोडा, हे काय चालले आहे ? भोंग्याविषयी काय चालले आहे ?

कार्यकर्ता : जे लोक कायदा हातात घेतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे आहे. पहाटे ५ वाजता मशिदीवर भोंगा वाजवून आजारी, लहान मुले, वृद्ध यांना तुम्ही त्रास देत आहात. तुम्ही विदेशात बसून अर्थहीन बोलत आहात. मला तुमची अर्थहीन बडबड ऐकायला वेळ नाही.

धर्मांध : मी मुसलमान आहे आणि खरा भारतीय आहे. मला बोलायचा अधिकार आहे. तुला काय करायचे ते कर. मी सगळ्यांना मारू शकतो. (धर्मांधाने शिव्या देत दूरभाष बंद केला.)

३. स्वधर्माविषयी जागृत असलेले धर्मांध !

धर्मांध हे स्वधर्मरक्षणाविषयी फार जागृत आहेत. धर्मातील गोष्टी तत्परतेने आणि निर्भयपणे मांडतात. बर्‍याच जणांचे बोलणे अभ्यासपूर्ण असते. धर्मांध संघटित आहेत आणि त्यांच्या बोलण्यात एकवाक्यता असते. एकमेकांशी समन्वय आणि नियोजन करून बोलतात. भारतातील घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष असते.

श्रीकृष्णचरणी कृतज्ञता, एक कार्यकर्ता, हिंदु जनजागृती समिती


Multi Language |Offline reading | PDF