भारत जगातील तिसरा मांस निर्यात करणारा देश !

एकेकाळी ‘विश्‍वगुरु’ अशी ओळख असलेल्या भारताची ही ओळख दुःखदायक आहे ! हिंदु राष्ट्रात ती पालटण्यात येईल !

संयुक्त राष्ट्रे – भारत जगातील तिसरा सर्वाधिक मांस निर्यात करणारा देश आहे आणि तो पुढील दशकभरात हा क्रमांक कायम ठेवेल, असे खाद्य आणि कृषि संस्था (एफ्एओ) आणि आर्थिक सहयोग संस्था (ओईसीडी) यांच्या अहवालामध्ये म्हटले आहे. हे मांस नेमके कोणत्या जनावराचे आहे, हे मात्र यात स्पष्ट करण्यात आलेले नाही. पहिल्या क्रमांकावर ब्राझील आणि दुसर्‍या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. भारताने वर्ष २०१६ मध्ये १५.६ लाख टन मांस निर्यात केले. वर्ष २०२६ मध्ये तो १९.३ लाख टन मांस निर्यात करून जगातील १६ टक्के मांसाचा निर्यात करणारा देश असेल.


Multi Language |Offline reading | PDF