दूरचित्रवाहिनीवरील ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत समर्थ रामदासस्वामी यांना दाखवलेलेच नसणे आणि संतांचे महत्त्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे कळले असल्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे

श्री. धनंजय हर्षे

‘मी घरी असतांना दूरचित्रवाहिनीवरील ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेचे काही भाग पाहिले. या मालिकेत समर्थ रामदासस्वामी यांना दाखवलेच नाही. ही गोष्ट माझ्या मनाला चांगलीच खटकली आणि माझ्या मनात पुढील विचार आले.

‘अफझलखान विजापूरहून निघाला आहे’, ही वार्ता समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवरायांना सांगितली होती. ‘स्थूल-सूक्ष्म रूपात अफझलखानासमोर कसे जायला हवे ?’, हे मार्गदर्शनही समर्थांनी शिवरायांना केले होेते. शिष्य कधीही स्वतःकडे कर्तेपणा घेत नाही; कारण तो कर्ताच नसतो. समर्थांसारखे गुरु पाठीशी असतांना यश मिळणार नाही, असे होणारच नाही. समर्थांनी अनेक मावळ्यांना प्रशिक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती व्हायला सांगितले होते. आज तेच समर्थ रामदासस्वामी दूरचित्रवाहिनीवाल्यांना नको आहेत.

संत आणि अवतार यांचे महत्त्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे आम्हाला कळले आहे. नाहीतर आम्हीही असेच भरकटलो असतो. त्यामुळे गुरूंच्या चरणी कोटी-कोटी कृतज्ञता !’

– श्री. धनंजय हर्षे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०१७)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now