प्रत्येक भारतियाने स्वतःला काश्मीरशी जोडणे आवश्यक ! – वेदाचार्य मोरेश्‍वर घैसास गुरुजी

वेदाचार्य मोरेश्‍वर घैसास गुरुजी

‘आद्यशंकराचार्यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्रीनगरमधील शंकराचार्य टेकडीवर कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य प.पू. विजयेंद्र सरस्वती यांनी १० दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २१ एप्रिलला माझी श्रीनगरला जायची सिद्धता चालू असतांनाच अनेकांनी तेथील अशांत परिस्थितीमुळे मला न जाण्याचा सल्ला दिला. याविषयी शंकराचार्य प.पू. विजयेंद्रस्वामी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ‘तुम्ही निश्‍चित जा. काहीही होणार नाही’, असे सांगितले. या आश्‍वासक विधानानंतर मी जाण्याचा निर्णय घेतला. श्रीनगरला गेल्यावर तेथील स्थितीविषयी जे जाणवले, ते येथे देत आहे.

आज काश्मीरमध्ये भारतियांनी आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी सतत जाणे आवश्यक आहे. तेथे वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होणेही आवश्यक आहे; कारण श्रीनगर हे मंदिरांचे शहर आहे. अनेक मंदिरांना ६०० ते ८०० वर्षांचा इतिहास आहे. तेथील अनेक मंदिरेही भग्नावस्थेत आहेत; पण याची भारतीय नागरिकांना माहिती द्यायला हवी. भारतियांनी काश्मीरमध्ये पर्यटनाला जाण्याव्यतिरिक्त तेथील मंदिरांना आणि आजूबाजूच्या नागरिकांना मानसिक बळ देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून काश्मिरी पंडितांना बळ मिळेल. काश्मीरमधील मंदिरांनाही आपण भेट द्यायला हवी. प्रत्येक भारतियाने काश्मीरमध्ये जाऊन स्वतःचे अस्तित्व दाखवून दिले पाहिजे. काश्मीर आपल्याला आपलेसे वाटण्यासाठी प्रत्येक भारतियाने स्वतःला काश्मीरशी जोडणे आवश्यक आहे.’

– वेदाचार्य मोरेश्‍वर घैसास गुरुजी, प्रधानाचार्य, वेदभवन, पुणे.


Multi Language |Offline reading | PDF