काणकोण येथे अमली पदार्थांची सर्रास विक्री ! – आमदार इजिदोर फर्नांडिस

पणजी – एका हत्येच्या प्रकरणातील संशयिताने ‘युवतीची हत्या करण्यापूर्वी तिला अमली पदार्थ विकण्यासाठी गोव्यातील काणकोण येथे आणले होते’, असे उत्तर दिले होते. यावरून काणकोण येथे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होते, हे स्पष्ट होते, अशी माहिती काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी २४ जुलै या दिवशी गोवा विधानसभेत दिली. (आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी यासंदर्भात काय कृती केली, तेही सांगावे ! – संपादक)

विविध खात्यांच्या मागण्यांच्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. ‘काणकोणमधील ९० टक्के उपहारगृहांमध्ये अमली पदार्थांचा व्यापार चालतो. याविषयी पोलिसांनाही सर्व ठाऊक असते, तरीही पोलीस कारवाई का करत नाहीत ?’, असा प्रश्‍नही त्यांनी या वेळी विचारला. ‘रात्रीच्या वेळी युवक एकत्र येऊन अनैतिक कृत्ये करतात, त्यासंदर्भात पोलिसांना दूरध्वनी करून माहिती दिल्यावरही पोलीस काही करत नाहीत’, असेही त्यांनी सांगितले. (जे पोलीस आमदारांच्या तक्रारीला प्रतिसाद देत नाहीत, ते पोलीस सामान्यांना काय प्रतिसाद देणार ? आमदारांनी अशा पोलिसांवर तात्काळ कारवाई करणे आवश्यक  आहे. ज्या हॉटेलमध्ये अमली पदार्थ व्यवहार होतात त्या हॉटेल मालकांवरही कारवाई करणे आवश्यक आहे. – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now