(म्हणे) मुसलमानांचे मौल्यवान रक्त सांडाल, तर परिणाम भोगावेच लागतील !

आतंकवादी मौलाना मसूद अजहर याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना धमकी

इस्लामाबाद – भारतात गोरक्षकांकडून मुसलमान समाजातील मुलांची हत्या केली जाते, ही गोष्ट निषेधार्ह आहे. गायीच्या रक्षणासाठी आमच्या लोकांचे रक्त पाटाच्या पाण्यासारखे वाहिले जात आहे, हे आम्ही कदापि सहन करणार नाही. मुसलमान समाजाचे रक्त मौल्यवान आहे, ते सांडाल, तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतील, अशी धमकी जैश-ए-महंमदचा प्रमुख आतंकवादी मौलाना मसूद अजहर याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिली आहे. त्यांनी या दोघांच्या विरोधात स्तंभलेखन चालू केले आहे. त्यात त्याने ही धमकी दिली आहे. पाकिस्तानात आमच्या इच्छेप्रमाणे एक नेता आला, तर आम्ही भारताला ४ दिवसांत धडा शिकवू, असेही त्याने म्हटले आहे.

मसूद पुढे लिहितो की,

१. अल्लाची कृपा झाली, तर उत्तरप्रदेश, कर्नाटक या राज्यांत मुसलमान समाज अशा पद्धतीने उत्तर देईल की, मोदी सरकारला ते दीर्घकाळ लक्षात ठेवावे लागेल. मी लिहिलेल्या लेखाला धमकी समजण्याचा वेडेपणा करू नका, हे वास्तव आहे. तुम्हाला याचे परिणाम भोगावेच लागतील.

२. तुम्ही नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा, षड्यंत्र रचा किंवा फाशी द्या मुसलमान समाज असल्या गोष्टींना कधीच घाबरत नाही. भारत आणि काश्मीर या ठिकाणी मुसलमान बांधवांचा जो छळ होतो, तो पाहून आमचा जीव जळतो.

३. माझ्या या नव्या स्तंभामुळे भारताचा जळफळाट होणार आहे; मात्र मला त्याने काहीही फरक पडत नाही. भारतात ज्या काही कारवाया झाल्या, त्या आता माझ्या नावावर वळवण्यात येतील हेसुद्धा मला ठाऊक आहे.

४. पठाणकोट, नगरौटा, गुरादासपूर आणि अखनूर येथील आक्रमणांंत स्थानिक लोक मारले गेले आहेत, ज्यामागे जैशचा हात होता.


Multi Language |Offline reading | PDF