चीनकडून कर्ज घेण्यापूर्वी विकसनशील देशांनी दोन वेळा विचार करावा ! – बांगलादेशचे अर्थमंत्री मुस्तफा कमाल

श्रीलंकेच्या झालेल्या आर्थिक दिवाळखोरीनंतर जागा झालेला बांगलादेश !

बांगलादेशचे अर्थमंत्री मुस्तफा कमाल

ढाका (बांगलादेश) – चीनकडून कर्ज घेण्यापूर्वी कोणत्याही विकसनशील देशांनी दोन वेळा विचार करणे आवश्यक आहे; कारण चीनकडून कर्ज घेतल्यामुळे काही देश संकटात सापडले आहेत, असे विधान बांगलादेशचे अर्थमंत्री मुस्तफा कमाल यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ या प्रसिद्ध योजनेशी संबंधित कर्ज घेण्यावरून ते बोलत होते. विशेष म्हणजे बांगलादेशही या योजनेत सहभागी असून त्याने चीनकडून ४०० कोटी डॉलर्सचे कर्ज घेतले आहे.

अर्थमंत्री कमाल पुढे म्हणाले की, कोणत्याही योजनेसाठी कर्ज घेण्यापूर्वी सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. सध्या जगाची स्थिती पहाता या योजनेमध्ये सहभागी होण्याविषयी कुणीही दोन वेळा विचार करील. प्रत्येक जण यासाठी चीनला दोष देत आहे. चीनही याविषयी असहमत होऊ शकत नाही.