शिवसेनेचे  खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !

मुंबई – एक सहस्र कोटी रुपयांहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना ३१ जुलैच्या मध्यरात्री अटक केली होती. त्यांना ८ ऑगस्ट या दिवशी तिसर्‍यांदा न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. या वेळी न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.