उत्तरप्रदेश सरकार राज्यातील ७५ बस आगारांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देणार !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उत्तरप्रदेश सरकार राज्यातील ७५ बस आगारांची नावे पालटणार आहे. त्यांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्यात येणार आहेत. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यात ४ कोटी ७६ लाख राष्ट्रध्वज फडकावण्यात येणार आहेत.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! असा निर्णय प्रत्येक राज्यांनी घ्यायला हवा !