भारतात ‘ओमिक्रॉन’चा नवा उपप्रकार !

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस

नवी देहली – गेल्या २ आठवड्यांत कोरोनाच्या जागतिक स्तरावर नोंदवलेल्या रुग्णसंख्येमध्ये जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. युरोप आणि अमेरिका येथे ‘बीए ४’ आणि ‘बीए ५’ या कोरोनाच्या उपप्रकाराच्या रुग्णसंख्या वाढत आहे. भारतासह इतर देशांमध्ये कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या उपप्रकाराचा ‘बीए २.७५’ हा उपप्रकार आढळून येत आहे. आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत.  हा उपप्रकार रोगप्रतिकार क्षमता न्यून करतो का ?, किंवा हा किती घातक आहे ? हे सांगणे सध्या कठीण आहे. आम्ही त्याचा अभ्यास करत आहोत, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी पत्रकार परिषदेत दिली.