भावपूर्ण चित्रे काढणारा ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा धुळेर, म्हापसा, गोवा येथील कु. निकुंज नीलेश मयेकर (वय १० वर्षे) ! 

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. निकुंज नीलेश मयेकर हा या पिढीतील एक आहे !

कु. निकुंज मयेकर
‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. निकुंज नीलेश मयेकर महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचा’, असे घोषित करण्यात आले होते. आता अनिष्ट शक्तींच्या त्रासांमुळे त्याची पातळी अल्प झाली आहे. त्याच्यासाठी नियमितपणे उपाय आणि योग्य संस्कार केल्यास त्याचे स्वभावदोष अन् त्याच्यावर आवरण असल्यास ते न्यून होईल आणि त्याची पातळी पुन्हा वाढेल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. निकुंज मयेकर याला चित्रकलेची आवड आहे. त्याने आरंभी ‘यूट्यूब’ वरील चलत्चित्रे (व्हिडिओ) पाहून चित्रे काढायला आरंभ केला. आता गुरुकृपेमुळे तो ग्रंथ आणि मूर्ती पाहून देवतांची चित्रे काढतो. त्याने देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे काढली आहेत.

कु. निकुंज याने काढलेले श्री गणपतीचे चित्र

१. निकुंज चित्रे काढतांना ‘देवच हात धरून चित्रे काढून घेत आहे’, असा त्याचा भाव असतो.

२. तो चित्रे काढतांना देहभान विसरतो.

३. त्याने काढलेली चित्रे पाहून माझी भावजागृती होते.

‘गुरुदेवा, तुमच्या कृपेमुळेच निकुंजमध्ये चित्रकलेची आवड निर्माण झाली आहे. ‘या चित्रकलेच्या माध्यमातून तुम्हीच त्याची साधना करवून घ्या’, अशी मी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– सौ. प्रगती नीलेश मयेकर (कु. निकुंजची आई), धुळेर, म्हापसा, गोवा. (२२.४.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक