भारताला जिहाद्यांपासून मुक्त करण्यासाठी केंद्राने सैन्याला मोकळीक द्यावी ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल

नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी ‘पोस्ट’ (लिखाण) सोशल मिडियामधून (सामाजिक माध्यमांमधून) प्रसारित केल्यानंतर कन्हैयालाल यांना त्यांच्या जिवाला धोका असल्याचे लक्षात आले. त्या वेळी त्यांनी उदयपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली; मात्र राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या राजस्थान पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर कन्हैयालाल यांची हत्या टळली असती. जिहादी मानसिकता बाळगणारे आतंकवादी केवळ हिंदूंचीच नव्हे, तर ख्रिस्ती, पारशी, यहुदी यांच्यासह जे ‘इस्लाम’ मानत नाहीत, त्या सर्वांचीच हत्या करतात. कट्टरतावादी मानसिकता संपवण्यासाठी आणि भारताला आतंकवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने पोलीस अन् सैन्य यांना मोकळीक द्यायला हवी.