मुलाला साधना करण्यासाठी सदैव प्रोत्साहन देणारे आदर्श आई-वडील !

श्री. अथर्व सावंत

माझे आई-बाबा (सौ. पुष्पा सावंत आणि श्री. प्रदीप सावंत) मला म्हणतात, ‘‘कोणतीही सेवा करत असतांना तू अभ्यास किंवा पुढचे शिक्षण यांविषयी विचार करू नकोस. तू केवळ साधनाच कर. नामजप कर. तू अन्य काही केले नाहीस, तरी चालेल.’’ मी सेवेसाठी बाहेर जात असतांना ते मला कधीच ‘जाऊ नकोस’, असे म्हणत नाहीत.

श्री. प्रदीप सावंत
सौ. पुष्पा सावंत

काही मासांपूर्वी दळणवळणबंदीच्या कालावधीमध्ये मी आई-बाबांना सहज विचारले, ‘‘बाबा, मी हरिद्वारच्या कुंभमेळ्याला सेवा करायला जाऊ शकतो का ?’’ तेव्हा ते लगेच म्हणाले, ‘‘हो. जा.’’ आई आणि बाबा मला साधना करण्यासाठी सदैव प्रेरित करतात.

– श्री. अथर्व सावंत (वय १८ वर्षे), इंदूर, मध्यप्रदेश.