नूपुर शर्मा प्रकरणी ढाका (बांगलादेश) येथेही मुसलमानानांकडून नमाजानंतर निदर्शने

भारतीय साहित्यांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन !

ढाका (बांगलादेश) – भारतात नूपुर शर्मा यांच्या विरोधात शुक्रवार, १० जूनच्या नमाजानंतर मुसलमानांनी अनेक ठिकाणी निदर्शने करून हिंसाचार केला. रांची येथे दोघा जणांचा मृत्यूही झाला. त्याच दिवशी बांगलादेशची राजधानी ढाका येथेही काही ठिकाणी मुसलमानानांनी नमाजानंतर निदर्शने केली. हातात फलक घेऊन नूपुर शर्मा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ढाक्यातील बस आगाराच्या ठिकाणी महामार्ग रोखण्यात आला. भारतीय साहित्यांवर बहिष्कार घालण्याचेही या वेळी आवाहन करण्यात आले.

सौजन्य हिंदुस्तान टाइम्स

संपादकीय भूमिका

बांगलादेश आणि पाकिस्तान येथे हिंदूंवर अन् हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात, तेव्हा भारतातील एकतरी हिंदु किंवा त्यांच्या संघटना याविरोधात अशा प्रकारे रस्त्यावर उतरून निषेध करतात का ? बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी करतात का ?