रशिया आमच्यावर कधीही अणूबाँब टाकू शकतो ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांचा दावा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

कीव (युक्रेन) – जगाला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याद्वारे अणूबाँबचा वापर करण्याच्या शक्यतेवरून सिद्ध राहिले पाहिजे, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी केले आहे. तसेच पुतिन रासायनिक शस्त्रांचाही वापर करू शकतात, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

युक्रेनच्या सीमेजवळ अण्वस्त्रांचा मारा करू शकणारी विमाने दिसली !

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या ५५ व्या दिवशी युक्रेनच्या सीमेवर रशियाची अण्वस्त्रांचा मारा करू शकणारी ४ लढाऊ विमाने उडतांना दिसून आली. ब्रिटनच्या गुप्तचरांच्या माहितीनुसारही रशिया युक्रेनवर कधीही अणूबाँब टाकू शकतो, अशी शक्यता आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा युक्रेन दौरा रहित

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन युक्रेनच्या दौर्‍यावर जाणार होते; मात्र त्यांचा हा दौरा रहित करण्यात आला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी ‘युक्रेनची राजधानी कीव येथे येऊन रशियाच्या विरोधातील आमच्या लढ्याला समर्थन द्यावे’, असे जो बायडेन यांना आवाहन केले होते. त्यानुसार बायडेन तेथे जाणार होते.

दौरा का रहित करण्यात आला, याचे कारण देण्यात आलेले नसले, तरी रशियाकडून अणूबाँब टाकण्याच्या शक्यतेमुळे तो रहित करण्यात आला आहे का ? असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.