भुदरगड (जिल्हा गारगोटी) – नवीन बांधकाम केलेली व्यावसायिक इमारत आणि बंगला यांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच स्वीकारणारे ग्रामविकास अधिकारी अमृत गणपति देसाई यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कह्यात घेतले आहे.
तक्रारदाराने बांधलेली नवीन व्यावसायिक इमारत आणि बंगला याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करण्यासाठी गारगोटी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अमृत देसाई यांनी २० लाख रुपयांची मागणी किंवा दुकान गाळा तडजोडीसाठी मागितले होते. तडजोडीअंती १४ लाख रुपयांची मागणी करून त्यातील पहिला हप्ता ५ लाख रुपये स्वीकारतांना देसाई यांना रंगेहात पकडण्यात आले.