प्रचाराच्या कालावधीत मी काहीही चुकीचे बोललो नाही ! – धनंजय महाडिक, भाजप

भाजपचे नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर, १ एप्रिल (वार्ता.) – काल विधानसभा निवडणूक प्रचाराच्या कालावधीत मी काहीही चुकीचे बोललेलो नाही. केवळ २ उमेदवारांची तुलना करत ‘प्लंबरचे काम ‘प्लंबर’ करेल आणि ‘इलेक्ट्रिशियन’चे काम ‘इलेक्ट्रिशियन’ करेल, असे म्हणालो होतो. यात कुणाचाही अवमान केलेला नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी याचा विपर्यास केला, असे मत भाजपचे नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केले.

दुसरीकडे भाजपचे नेते धनंजय महाडिक यांनी महिलांचा अपमान केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीमधील महिला कार्यकर्त्यांनी महाडिक यांचा निषेध करत महाराणी ताराराणी पुतळ्यासमोर निषेध आंदोलन केले. या महिलांनी ‘महाडिक यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.