माओवाद्यांचे जाळे नष्ट करण्याचा केंद्र सरकारचा सुरक्षादलांना आदेश !

नवी देहली – केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील माओवादी आणि त्यांचे समर्थक यांचे जाळे नष्ट करण्याची सूचना दिली आहे, असे सुरक्षा आस्थापनातील सूत्रांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्रालयाशी संलग्न असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी म्हणाले, ‘‘माओवादी रणनीतीकार अनेक शहरांमध्ये सक्रीय राहून भूमीगत नक्षलवाद्यांना पाठिंबा देत आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.’ गृह मंत्रालयाने सुरक्षादलांना भूमीगत नक्षलवाद्यांविरोधात आक्रमण चालू करण्याचे निर्देश दिले.’’