गडांवरील अतिक्रमणे हटवून ते पूर्ववत् न केल्यास प्रशासनाला जनआक्रोशास सामोरे जावे लागेल ! – रघुजीराजे आंग्रे, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे ९ वे वंशज

रघुजीराजे आंग्रे, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे ९ वे वंशज

‘पुरातत्व विभागाच्या अनुमतीनेच कुठलीही ऐतिहासिक वास्तू, गड यांच्या संवर्धनाची कामे करता येतात; मात्र मुंबईजवळील कुलाबा किल्ल्याच्या थेट तटबंदीवरच एक मजार (थडगे) बनवण्याचा प्रयत्न व्हावा, हा एक वेगळाच उन्माद आहे. थडगे बांधून अतिक्रमण करण्याच्या केलेल्या प्रयत्नाला आमचा विरोध आहे. पुरातत्व विभागाने अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात खटले प्रविष्ट करून ती अतिक्रमणे पूर्णपणे काढावीत आणि किल्ला पूर्ववत् स्थितीत करावा अन्यथा जनआक्रोशाला सामोरे जावे.