रशियामधील व्यवसाय बंद करणार्‍या विदेशी आस्थापनांच्या मालमत्तांचे रशिया राष्ट्रीयीकरण करणार !

प्रातिनिधिक छायाचित्र

मॉस्को (रशिया) – रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जगभरातून रशियावर विविध निर्बंध घातले जात आहेत. नुकतेच अमेरिकेने रशियाच्या तेल आणि गॅस यांवर निर्बंध घताले आहेत. १०० हून आंतरराष्ट्रीय आस्थापनांनी रशियातील त्यांचा व्यवसाय गुंडळाला आहे. यात ‘बोईंग’ आणि ‘एअरबस’ यांसारख्या विमाननिर्मिती क्षेत्रातील मोठ्या आस्थापनांपासून ते फेसबूक, ‘गूगल’ यांसारख्या आस्थापनांचाही समावेश आहे. यावर प्रत्युत्तर देत रशियाने ज्या आस्थापनांनी व्यवसाय बंद केला आहे, त्यांच्या मालमत्तांचे राष्ट्रीयीकरण करण्याची सिद्धता चालू केली आहे. रशियाने म्हटले आहे की, असे केल्यास लोकांच्या नोकर्‍याही वाचतील आणि रशिया देशातच सामान बनवण्यातही सक्षम राहील.