|
टाकवे बुद्रुक (जिल्हा पुणे) – मावळ तालुक्यातील लेण्या, तसेच गड हा ऐतिहासिक वारसा मावळला मिळालेल्या अनमोल ठेवींपैकी एक आहे. मावळ येथे लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, राजमाची, ढाकगड हे गड, तर कार्ला, भाजे, बेडसे, घोरावडेश्वर या मुख्य लेण्या आहेत; मात्र दुर्दैवाने या लेण्यांची काही ठिकाणी पडझड झाली असून काही ठिकाणी चिरा पडल्या आहेत.
इतिहासप्रेमी संतोष दहिभाते म्हणाले की, लेण्यांकडे दुर्लक्ष होत असून या लेण्यांचे संवर्धन आणि काही ठिकाणी झालेली पडझड दुरुस्त करून मावळ येथील ऐतिहासिक लेण्यांचा वारसा जपण्याची मोठी आवश्यकता आहे. मावळला लाभलेल्या ऐतिहासिक वारशामुळे परदेशातही मावळची ओळख आहे. मावळ येथील इतर अपरिचित लेण्यांकडे बर्याच जणांचे पाय वळतांना दिसत नाहीत. मावळ येथील अशा लेण्यांचा विकास आणि जतन होणे पुष्कळ आवश्यक आहे.