‘एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाची संधी लाभली. या सत्संगानंतर मला स्वतःत जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.
१. साधनेची स्थिती
अ. माझा ध्यानाचा कालावधी ४ घंट्यांवरून आता अर्धा – एक घंटा झाला आहे. आता मला कृष्णलोकातील अनुभूती येत नाहीत आणि सूक्ष्मातील काहीच दिसत नाही.
(स्पष्टीकरण : साधिकेला ध्यान लागायचे नाही, तर गुंगी यायची. ती येणे अल्प झाले. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले )
आ. भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून माझी शिकण्याची ओढ वाढली आहे. मला अंतर्मनातून आनंद जाणवतो. माझ्या मनाची स्थिरताही वाढली आहे.
इ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझी जन्मापासून काळजी घेत आहेत’, या विचाराने माझा कृतज्ञताभाव जागृत होतो आणि त्यांच्यावरील माझी श्रद्धा वाढत आहे.
ई. माझी स्वतःमध्ये पालट करण्याची तळमळ ३० टक्क्यांनी वाढली आहे. पूर्वी माझ्या मनात सहसाधकांविषयी पूर्वग्रह होते. त्यामुळे त्यांना साहाय्य करतांना माझ्या मनात विकल्प येत. आता त्यांचे प्रमाण न्यून झाले आहे. त्यामुळे मला सहसाधकांना साहाय्य करता येते. मला मनापासून माझ्या चुकांची खंत वाटते आणि सहसाधकांची क्षमा मागितली जाते.
उ. माझ्यातील समष्टी भाव वाढला असून माझ्या समवेत सेवा करणार्या सर्व साधकांशी बोलतांना मला आनंद वाटतो आणि त्यांच्याशी जुळवून घेता येते.
२. सत्संगातील चैतन्यामुळे कुटुंबियांमध्ये झालेले पालट
२ अ. अनेक वर्षांपासून वडिलांचा साधनेला असलेला विरोध न्यून होणे : ‘गोवा ते अमरावती’ हे प्रवासासाठी १००० कि.मी.चे अंतर असूनही सत्संगातील चैतन्यामुळे मला कुटुंबियांमध्येही पालट जाणवत आहेत. या वेळी मी अमरावतीला घरी गेले, त्या वेळी मला वडिलांचा विरोध जाणवला नाही. (यापूर्वी वडिलांचा माझ्या साधनेला विरोध होता.) ते स्वतःहून माझ्याशी बोलत होते आणि माझी चौकशीही करत होते. त्यामुळे दिवाळीत घरी गेल्यावर मला मोकळेपणाने आणि मिळून मिसळून रहाता आले.
३. वायूतत्त्वाच्या संदर्भात येणारी अनुभूती
मला सेवेच्या ठिकाणी किंवा भोजनकक्षात नामजप करतांना कधी कधी स्पर्श जाणवतो. एकदा ‘कुणीतरी मला ध्यानातून हालवून उठवत आहे’, असा स्पर्श जाणवला. तो स्पर्श सहज आणि हळूवार (हलका) होता.
प्रश्न : हा स्पर्श देवतांचा आहे का ?
उत्तर : ही वायूतत्त्वाच्या संदर्भात येणारी अनुभूती आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘परात्पर गुरु डॉक्टर, तुम्हीच हे सर्व माझ्याकडून लिहून घेतले’, यासाठी कृतज्ञता !’
– आपली,
कु. स्मिता ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |