स्वाभिमानी लोकमान्य टिळक !

एकदा महायुद्धाच्या वेळी सैन्यभरतीसाठी मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांनी सभा भरवली. त्यात लोकमान्य टिळकांनाही बोलावले होते. सभेत टिळकांच्या तोंडून ‘स्वराज्य’ आणि ‘स्वदेश’ असे शब्द निघताच गव्हर्नरने लोकमान्य टिळकांना ‘स्वदेशा’विषयी काहीही न बोलण्यास सांगितले. तेव्हा टिळक म्हणाले, ‘‘असे जर असेल, तर सभा सोडून जाण्याविना स्वाभिमानी मनुष्याला दुसरा मार्गच नाही.’’ असे म्हणून लोकमान्य टिळक लगेच सभा सोडून बाहेर पडले.