राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी आणि आदर्श प्रजासत्ताक राज्य येण्यासाठी करावयाच्या काही मागण्या

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आपण एक विद्यार्थी म्हणून आपण काही मागण्या करूया. या मागण्या जर सध्याच्या शासनकर्त्यांनी मान्य केल्या, तर प्रत्येकात राष्ट्रप्रेम जागृत होईल आणि लवकरच आदर्श प्रजासत्ताक राज्य येईल. या मागण्यांप्रमाणे आमच्या शिक्षणपद्धतीत पालट होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

  • प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना थांबवा.
  • राष्ट्रीय शिक्षणात समानता हवी. आंतरराष्ट्रीय, केंद्रशासित आणि राज्य असे शिक्षणाचे तुकडे करून आमच्यातील राष्ट्रीयत्वाची भावना नष्ट करू नका.
  • प्रत्येकाला मातृभाषेतूनच शिक्षण मिळायला हवे.
  • आम्हाला सैनिकी शिक्षण द्या.
  • आमच्यात राष्ट्रप्रेम निर्माण करणार्‍या आदर्श क्रांतीकारकांची अपकीर्ती होऊ देऊ नका.
  • आमच्यातील संघभावना वाढावी; म्हणून जात, धर्म आणि पंथ यांवरून आमची वर्गवारी करू नका.
  • प्रजासत्ताकदिन तिथीनुसार साजरा करा.
  • आमच्यातील गुणवत्तेनुसार विद्यालयात प्रवेश द्या, आरक्षण नको.
  • सर्व शाळांमधून पूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणणे बंधनकारक करा.
  • सर्व शाळांची प्रार्थना एकच हवी.
  • शाळेचा गणवेष इंग्रजांच्या वेशाप्रमाणे, उदा. टाय, टी-शर्ट असा नको.

विद्यार्थीमित्रांनो, वरील सर्व सूत्रे कृतीत आणण्याचा आपण या प्रजासत्ताकदिनी निश्चय करूया.

– श्री. राजेंद्र पावसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.