पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या नातेवाईकाच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाची धाड !

अवैध वाळू उपसा प्रकरण

केंद्र सरकारने याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे ! – संपादक

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी

चंडीगड – अवैध वाळू उपसा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांच्या मोहाली येथील नातेवाईकाच्या घरासह १० ठिकाणी १८ जानेवारी या दिवशी धाड टाकली. भूपिंदर सिंह हनी असे चन्नी यांच्या या नातेवाईकाचे नाव आहे. अवैध वाळू उपसा प्रकरणी ‘ईडी’ने वर्ष २०१८ मध्ये कुदरतदीप सिंह नावाच्या व्यक्तीविरुद्ध केलेल्या कारवाईत भूपिंदर सिंह हनी यांचे नाव समोर आले होते.

यापूर्वी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या अवैध वाळू उपसा प्रकरणी आवाज उठवला होता. ‘पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध वाळू उपसा होत असतांना त्यांना याची माहिती नाही, यावर विश्‍वास ठेवणे कठीण आहे’, अशा शब्दांत केजरीवाल यांनी चन्नी यांच्यावर आरोप केले होते.