मद्यविक्री करणार्‍या दुकानांना महापुरुषांची नावे न देण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह ! – हिंदु जनजागृती समिती

गेल्या १० वर्षांत हिंदु जनजागृती समितीने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना याविषयी दिली होती निवेदने !

मुंबई – दुकाने आणि आस्थापने यांच्यावरील नामफलक मराठी भाषेत असण्याची सक्ती करणारा, तसेच ‘बिअर बार’ अन् मद्याची दुकाने यांना राष्ट्रपुरुष, महनीय महिला, गड-किल्ले यांची नावे न देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचे हिंदु जनजागृती समितीने स्वागत केले आहे.

या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. आम्ही यापूर्वी अनेकदा ‘मद्याची दुकाने अन् ‘बिअर बार’ यांना देवता, राष्ट्रपुरुष, संत आणि श्रद्धास्थाने यांची नावे देण्यात येऊ नयेत’, अशी शासनाकडे मागणी केली होती. गेल्या १० वर्षांत हिंदु जनजागृती समितीने अनेक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना याविषयीची निवेदनेही दिली होती. आमची ही मागणी मान्य करत शासनाने महापुरुषांचा अपमान रोखण्यासाठी एक पाऊल उचलले आहे, असे आम्ही मानतो. याविषयी ठाकरे सरकारचे आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो.