भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र हिंदु राष्ट्रातच भ्रष्टाचारमुक्त होईल ! – संपादक
लातूर – भूमीच्या व्यवहारात साहाय्य करण्यासाठी १५ सहस्र रुपयांची लाच घेतांना लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नायब तहसीलदार शेषराव शिवराम टिप्परसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३ जानेवारी या दिवशी अटक केली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार, त्याची आई आणि बहीण यांच्यामध्ये भूमीचा व्यवहार झाला होता. या व्यवहारात तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांनी बँकेचे कर्ज घेतलेले होते, त्यामुळे भूमी बँकेचा बोजा होता. हा बोजा असल्याने भूमीचा फेरफार नोंदवण्यास बँकेचा आक्षेप होता. त्यामुळे तक्रारदाराच्या बाजूने निकाल देऊन भूमीच्या व्यवहारात साहाय्य करण्यासाठी १५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी नायब तहसीलदार शेषराव टिप्परसे यांनी तक्रारकर्त्याकडे केली होती.