‘२४.९.२०१९ च्या रात्री रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेने श्रीविष्णुयाग करण्यात आला. यागापूर्वी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा निलेश सिंगबाळ यांच्या शुभहस्ते श्रीमहाविष्णूची पूजा चालू असतांना मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. मध्येच मला सूक्ष्मातून नाग दिसले, ‘ते सर्वांकडे बघत आहेत’, असे जाणवले. तितक्यात ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी नागदेवतेचा श्लोक म्हटला. तेव्हा ‘मला नाग का दिसला’, हे समजले आणि कृतज्ञता वाटली.’
– श्री. वैभव मेढेकर, गावठाण, पुणे. (२५.९.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |