‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ अन् श्रीकृष्णाने ‘भगवद्गीते’तून अर्जुनाला ‘शत्रूंशी कसे लढायचे ?’ याविषयी केलेला उपदेश यांतील साम्य

सौ. अर्पिता देशपांडे

‘श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘भगवद्गीते’त सांगितले आहे, ‘सर्व कौरवांचा आधीच मृत्यू झाला आहे. तुला केवळ शस्त्र उचलायचे आहे.’ त्याप्रमाणेच आपल्या अंतर्मनातील कौरवरूपी स्वभावदोष आणि अहं गुरुच नष्ट करतात. आपल्याला क्रियमाण वापरून केवळ मनापासून प्रयत्न करायचे आहेत. ‘श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘धर्म-अधर्माच्या युद्धात स्वतःच्या दोषांशी कसे लढायचे ?’, याचे ज्ञान दिले. त्याप्रमाणे ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिये’त गुरु आपल्याला स्वतःचे दोष अन् अहं यांच्याशी लढून देवाच्या कृपेला पात्र कसे व्हायचे ?’, याचे ज्ञान देत आहेत’, असा भाव ठेवल्याने माझ्यात सकारात्मकता निर्माण होऊ लागली. ‘आपल्याला प्रक्रिया आत्मसात् करता यायला हवी’, असे आतून वाटू लागले.’ – सौ. अर्पिता विपीन देशपांडे, सनातन आश्रम, मिरज. (२०.११.२०१६)