‘हल्दीराम’ची ५०० उत्पादने, ‘आशीर्वाद’ आटा, ‘अमूल’चे आईस्क्रीम, ‘फॉर्च्युन ऑईल’, या खाद्यपदार्थांसह अनेक आयुर्वेदाची औषधे ही ‘हलाल सर्टिफाइड’ आहेत. भारताच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे (‘एफ्.डी.ए.’चे) ‘खाद्य सुरक्षा आणि मानकीकरण प्राधिकरण’ (एफ्.एस्.आय.ए.) हे अधिकृत शासकीय प्रमाणपत्र असतांना हे ‘हलाल सर्टिफिकेट’ कशासाठी ? एकीकडे खाद्यपदार्थांशी संबंधित प्रमाणपत्र देणारी ‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारची व्यवस्था असतांना हलाल प्रमाणपत्र देण्याची अनुमती खासगी इस्लामिक धार्मिक संस्थांना का देण्यात आली ?