इंग्रजी मासिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक सौ. प्रियांका पवार यांना ‘अग्निहोत्र’ करायला लागल्यापासून आलेली अनुभूती आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रती त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !
सौ. प्रियांका पवार गेल्या आठ वर्षांपासून इंग्रजी मासिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक आणि ‘प्रोफाईल मेंबर’ आहेत. त्या मूळच्या पंजाबी आहेत. मागील आठवड्यात त्यांना पुढील अनुभूती आली.
१. वर्ष २०१६ पासून अग्निहोत्र करू लागल्यावर चांगल्या अनुभूती आल्याने श्रद्धा वाढणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एका ग्रंथात मी अग्निहोत्र करण्याविषयी वाचले. मी वर्ष २०१६ पासून अग्निहोत्र करू लागले आणि ते केल्यावर मला चांगल्या अनुभूती आल्या. आताही त्याविषयी लिहितांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत आहेत. कुणीतरी माझ्या प्रार्थनेची पूर्तता केल्याची अनुभूती आल्याने माझी भक्ती अधिक पटींनी वाढली आहे. सूक्ष्मातून (आध्यात्मिक) काहीतरी अनुभवण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. एक शक्ती, ज्या शक्तीची यापूर्वी मला काहीच कल्पना नव्हती.
२. देवतांचा नामजप करणे
अग्निहोत्र करण्याच्या व्यतिरिक्त मी आमची कुलदेवी, श्री दुर्गादेवी, श्री गुरुदेव दत्त आणि शिव यांचा नामजप करते, तसेच गायत्रीमंत्रही म्हणते.
३. ‘ग्रंथात दिलेली माहिती १०० टक्के सत्य असणार’, असे वाटणे
मी जरी पूर्णपणे नास्तिक नसले, तरी पूर्णतः आस्तिकही नव्हते. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाला भेट देण्यापूर्वी मी या स्पर्धात्मक जगात एक सांसारिक जीवन जगत होते. या संकेतस्थळावरील काही अशा गोष्टी आहेत, ज्या माझ्याशीही संबधित आहेत. त्यामुळे ‘ग्रंथात दिलेली माहिती १०० टक्के सत्य असणार’, असे मला वाटते.
एका सर्वसामान्य व्यक्तीलाही समजू शकेल, इतक्या सोप्या पद्धतीने ‘अध्यात्म’ शिकवल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘अशा दैवी व्यक्तीने सांगितलेली साधना मी करत आहे’, हे माझे भाग्यच आहे.’
– सौ. प्रियांका पवार, मुंबई (नोव्हेंबर २०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |