दैनिक ‘लोकमत टाइम्स’कडून श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे विडंबन !

कराच्या संदर्भातील माहिती स्पष्ट करण्यासाठी श्रीकृष्ण आणि अर्जुन अशा नावांचा वापर !

हिंदूंनो, असे लेख केवळ वाचून बाजूला न ठेवता हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणार्‍या दैनिक ‘लोकमत टाइम्स’ला वैध मार्गाने विरोध करा ! – संपादक

संभाजीनगर – इंग्रजी दैनिक ‘लोकमत टाइम्स’च्या संभाजीनगर आवृत्तीमध्ये ‘करनीती’ या साप्ताहिक स्तंभामध्ये कराच्या संदर्भात माहिती दिली जाते. त्यामधील सूत्रांचे स्पष्टीकरण देतांना श्रीकृष्ण आणि अर्जुन अशी नावे वापरून हिंदूंच्या देवतांचे विडंबन करण्यात आले आहे. संबंधित लेख २२ नोव्हेंबर या दिवशी पृष्ठ ७ वर प्रकाशित करण्यात आला आहे. (प्रत्येक वेळी हिंदूंच्याच देवतांची नावे का वापरली जातात ? याचा हिंदूंनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा ! – संपादक)

श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद !

अर्जुन : कृष्णा, जीएस्टी (वस्तू आणि सेवा कर) कायद्यांतर्गत केंद्र सरकारच्या वतीने कोरोना प्रकोपामुळे व्यापार्‍यांना कोणत्या सवलती देण्यात आल्या आहेत ?

श्रीकृष्ण : अर्जुना, जीएस्टीअंतर्गत केंद्र सरकारने १ मे या दिवशीच्या केंद्रीय कर अधिसूचनेद्वारे विविध अनुपालनांचे दिनांक वाढवले आहेत.

या संभाषणात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा एकेरी नावाने उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी ‘करनीती – गणपतीचा जयजयकार; जीएस्टीचा हाहा:कार !’, ‘करनीती – विघ्नहर्ता, जीएस्टीच्या रिटर्नची विघ्ने दूर करा’ अशा स्वरूपाच्या लेखांमधूनही श्री गणेशाचे विडंबन करण्यात आले होते.

‘लोकमत टाइम्स’च्या संभाजीनगर आवृत्तीमधील विडंबनात्मक लेख
वरील लेख प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हा लेख प्रसिद्ध केला आहे. – संपादक