‘होमिओपॅथी स्वयं उपचार’ यासंदर्भातील माहिती कळवा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना विनंती !

‘आपत्काळात आधुनिक वैद्य (डॉक्टर), रुग्णालये, औषधे यांची उपलब्धता नसेल. अशा परिस्थितीत सामान्य जनतेला त्यांना होणार्‍या विविध विकारांवर होमिओपॅथीचे स्वयं उपचार (कुणालाही स्वतःच्या स्वतः करता येण्यासारखे उपचार) करता यावेत, यासाठी सनातन तातडीने या विषयावर माहिती देणार्‍या ग्रंथाची निर्मिती करत आहे.

जे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना ‘होमिओपॅथीचे स्वयं उपचार’, याविषयी माहिती असेल, त्यांनी ती माहिती लिहून किंवा टंकलिखित करून लवकरात लवकर सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावी. या विषयावर माहिती देणारे ग्रंथ किंवा लिखाण उपलब्ध असल्यास तेही पाठवू शकता. साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांचे परिचित वा नातेवाईक यांना यासंदर्भात काही माहिती असल्यास तीही पाठवावी.

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’

– होमिओपॅथी वैद्य अंजेश कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.११.२०२१)