सातारा, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – लाच स्वीकारण्याच्या विविध प्रकरणांमध्ये खासगी मध्यस्थ म्हणून आढळून येतात. आता नवीन नियमानुसार खासगी व्यक्तीवरही लाच प्रकरणी कारवाई करता येणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिली.
शिर्के पुढे म्हणाले की, मागील वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने २० प्रकरणे हाताळण्यात आली. या वर्षी ऑक्टोबरपर्यंत १९ प्रकरणे आमच्याकडे आली आहेत. अजून प्रकरणे समोर येतील. नागरिकांनी विनासंकोच मला ९७७३१ ९००६४ या माझ्या वैयक्तिक भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क करावा. तुम्हाला आमच्यापर्यंत येणे शक्य नसल्यास आम्ही तुमच्यापर्यंत येऊ. माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवू.