अभिनेते शाहरूख खान यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्याची मागणी !

डावीकडून प्रभाकर साईल, आर्यन खान आणि समीर वानखेडे

मुंबई – अभिनेते शाहरूख खान यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि इतर पाच जण यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी माहिती अहवाल (एफ्.आय.आर्.) प्रविष्ट करण्यात यावा, अशी मागणी अधिवक्त्या सुधा द्विवेदी यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.

अधिवक्त्या सुधा द्विवेदी यांनी एम्आरए  मार्ग पोलीस ठाणे, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे आणि राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे लेखी तक्रार केली. या प्रकरणी ‘फ्री प्रेस जर्नल’ने वृत्त दिले आहे.

तक्रारीत द्विवेदी यांनी म्हटले आहे की, या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल, किरण गोसावी आणि सॅम डिसोझा यांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे, या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात यावी.

‘आम्हाला तक्रार मिळाली आहे; परंतु ती अजून प्रविष्ट करण्यात आलेली नाही’, असे एका अधिकार्‍याने सांगितले.