केंद्रीय यंत्रणेकडून राज्य सरकारला वेठीला धरण्याचे काम होत आहे ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

प्रभाकर साईल यांना मुंबई पोलिसांकडून संरक्षण

दिलीप वळसे पाटील

मुंबई – अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरून कारवाई करण्यासाठी कुणीतरी तक्रार नोंदवायला हवी. तक्रार प्रविष्ट झाल्यास पुढील कारवाई केली जाईल. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी अल्प वेळ चर्चा झाली. आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा एवढा वापर कधीही झालेला नाही. केंद्रीय यंत्रणा राज्य सरकार आणि राजकीय व्यक्ती यांना वेठीस धरण्याचे काम करत आहे, असे वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. २५ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांपुढे बोलतांना गृहमंत्र्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील कारवाईतील पंच प्रभाकर साईल यांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे, अशी माहितीही गृहमंत्री वळसे पाटील यांनी या वेळी दिली.