समीर वानखेडे यांच्या याचिकेवरील सुनावणीस मुंबई सत्र न्यायालयाचा नकार !

समीर वानखेडे

मुंबई – अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांविषयी तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका केली होती. २५ ऑक्टोबर या दिवशी सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. ‘याविषयी मुंबई उच्च न्यायालयात याचिका चालू असल्यामुळे तुमचे म्हणणे मुंबई उच्च न्यायालयात मांडा’, असे नमूद करत मुंबई सत्र न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे.