साधना करतांना येणार्‍या अनुभूती लिहून देण्याचे महत्त्व लक्षात घेऊन, त्या वेळोवेळी लिहून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पाठवा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना विनंती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. साधना करतांना येणार्‍या अनुभूती आपण साधनामार्गावर योग्य प्रकारे जात असल्याच्या दर्शक असतात. त्यामुळे ‘साधनेसाठी कोणते प्रयत्न केल्यामुळे आपल्याला ही अनुभूती आली ?’, हे समजून घेणे महत्त्वाचे असते. ते अन्य साधकांनाही कळल्यास त्यांनाही या अनुभूतींमधून शिकता येते.

२. काही वेळा आपल्याला आलेली अनुभूती इतरांनाही आली असली, तरी ‘ती नेमकी कशामुळे आली ?’, हे त्यांना कळत नाही. आपली अनुभूती वाचल्यावर त्यांना त्याचे कारण कळू शकते.

३. एखादा साधक प्रयत्नांच्या एका टप्प्याला थांबला असेल, तर त्याला पुढच्या टप्प्याच्या अनुभूती वाचून साधना करण्यासाठी स्फूर्ती मिळते.

४. या अनुभूतींच्या माध्यमातून समाजालाही अध्यात्म उलगडून दाखवता येते. एकच अनुभूती अनेक साधकांना आली, तर ‘अध्यात्मातील एखादे तत्त्व कसे योग्य आहे ?’, हे त्यातून सिद्ध होते आणि ते बुद्धीवाद्यांना सांगता येते.

५. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे अनुभूती लिहून देतांना ‘गुरूंनी शिकवलेली साधना आणि त्यांची कृपा यांमुळे ही अनुभूती आली’, हा कृतज्ञतेचा भाव त्यातून व्यक्त झाला पाहिजे. त्यामुळे ‘माझ्या प्रयत्नांमुळे मला ही अनुभूती आली’, असा कर्तेपणा घेण्याचाही भाग होत नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.८.२०२१)

लिखाण पाठवण्यासाठी संगणकीय पत्ता : [email protected]

पोस्टाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, २४/बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१