५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. कनिष्का राकेश अष्टेकर (वय ५ वर्षे)

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. कनिष्का राकेश अष्टेकर ही आहेत !

भाद्रपद कृष्ण पक्ष नवमी (३०.९.२०२१) या दिवशी वसई (जिल्हा पालघर) येथील चि. कनिष्का राकेश अष्टेकर हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. कनिष्का राकेश अष्टेकर

चि. कनिष्का राकेश अष्टेकर हिला ५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. जन्मापूर्वी

१ अ. देवतांच्या चित्रांजवळ बसल्यावर बाळाने आतून प्रतिसाद देणे : ‘बाळ गर्भात असतांना मी सकाळी आणि संध्याकाळी कुलदेवता, श्रीकृष्ण आणि दत्त यांचा नामजप करत असे. त्याचप्रमाणे मी ‘हरिविजय कथासार’ आणि ‘श्री नवनाथ भक्तिसार’ या दोन ग्रंथांतील एका अध्यायाचे वाचन करत असे. मला देवतांच्या चित्रांजवळ बसल्यावर पोटात हालचाल होऊन ‘बाळ आतून प्रतिसाद देत आहे’, असे जाणवायचे.

१ आ. देवावर श्रद्धा ठेवल्याने कोणतीही अडचण न येता नैसर्गिक प्रसुती होणे : आम्हाला पहिला मुलगा असल्यामुळे ‘आता मुलगी हवी’ अशी घरातील सर्वांचीच इच्छा होती. मी पहिल्या बाळंतपणाच्या वेळी माहेरी असतांना मला पुष्कळ त्रास झाला होता; परंतु यजमानांची स्वामी समर्थांवर श्रद्धा असल्याने त्यांनी ‘तू काळजी करू नकोस’, असे मला सांगितले. खरोखर देवाच्या कृपेने कुठलीही अडचण न येता माझी प्रसुती नैसर्गिक झाली आणि कन्यारत्न झाले. आम्ही तिचे नाव ‘कनिष्का’ असे ठेवले.

२. जन्म ते ३ वर्षे

सौ. मधुरा अष्टेकर

२ अ. जन्म झाल्यावर हातांच्या मुद्रा करणे : प्रसुतीनंतर कनिष्काला प्रथम यजमानांच्या हातांत देण्यात आले. तेव्हा ती पूर्ण डोळे उघडून सगळीकडे एकटक पहात होती. तिने तिच्या दोन्ही हातांच्या मुद्रा केलेल्या होत्या.

२ आ. देवाप्रती ओढ असणे

२ आ १. लहानपणापासून देवतांच्या चित्रांकडे पहाणे : एक वर्ष पूर्ण व्हायच्या आधीपासूनच तिला देवाची प्रचंड ओढ होती. तिचे आजी-आजोबा भगवान श्रीकृष्णाचे चित्र समोर ठेवून जपाला बसले की, ती श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहायची. तिला समजायला लागल्यानंतर ती प्रत्येक वेळी हात जोडून आज्ञाचक्रावर अंगठे ठेवून देवांना नमस्कार करू लागली आणि त्यानंतर इतरांचे बघून भूमीवर झोपून साष्टांग नमस्कार करू लागली.

२ आ २. आजोबांसमवेत देवांची पूजा करणे : कनिष्का साधारण अडीच-तीन वर्षांची असल्यापासून तिचे आजोबा पूजा करायला बसले की, ती त्यांच्या बाजूला बसून देवाला हळद, कुंकू आणि अक्षता वाहून देवापुढे नतमस्तक होऊन साष्टांग नमस्कार घालत असे. ती प्रतिदिन आजोबांसमवेत देवपूजा करते.

२ आ ३. देऊळ दिसल्यावर हात जोडून नमस्कार करणे : ती देवळात गेल्यावर दोन्ही हात जोडून नमस्कार करते. रस्त्याने जातांना मध्येच देऊळ दिसले की, देऊळ बंद असले, तरी ती पायरीवर उभी राहून नमस्कार केल्याविना पुढे जात नाही. सकाळी मी उंबरठ्यावर रांगोळी काढते. ते पाहून आता तीही रांगोळी काढते.

३. निरीक्षणक्षमता

ती कुठलीही नवीन वस्तू निरखून पहाते आणि लक्षात ठेवते. तिची निरीक्षणशक्ती चांगली असून स्मरणशक्तीही दांडगी आहे. ती प्रत्येक गोष्ट शिकून परत स्वतः करून बघते.

४. साधकांशी जवळीक साधणे

घरी कुणी साधक येणार असल्याचे कळल्यावर ती त्यांची वाट बघत असते. साधक घरी आल्यावर ती लगेच जवळीक साधून त्यांच्याकडे जाते.

५. भाव

ती ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ घेऊन त्यातील चित्रे पहाते. ती रात्री झोपण्यापूर्वी गणपति आणि श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेला नमस्कार करूनच झोपायला जाते.

६. स्वभावदोष

मनानुसार न झाल्यास चिडणे आणि हट्टीपणा

– सौ. मधुरा राकेश अष्टेकर (कनिष्काची आई), वसई, जिल्हा पालघर (६.५.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता