‘पंचतत्त्वेही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आधीन आहेत’, याची प्रचीती देणारी साधिकेला आलेली अनुभूती !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. निसर्गाचे निरीक्षण करतांना ‘निसर्ग चित्राप्रमाणे स्थिर वाटत आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले संगणकावर धारिका वाचत होते. धारिका वाचतांना नेहमीप्रमाणे ते बसल्या ठिकाणाहून समोरील निसर्गाकडे बघत होते. ते नेहमीच झाडे, डोंगर आणि आकाश यांचे निरीक्षण करत असतात. ते ‘निसर्गात काय पालट होतात ?’, याचे निरीक्षण करून त्याचे छायाचित्र काढायला किंवा चित्रीकरण करण्यास सांगतात. त्याप्रमाणे त्या दिवशी ते निरीक्षण करत होते. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या साधकांना सांगितले, ‘‘निसर्ग बघा, कसा चित्राप्रमाणे दिसत आहे. झाडाचे एकही पान हालत नाही. स्थिर वाटत आहे.’’ त्या वेळी पाहिले, तर सर्व वातावरण निःशब्द झाल्याप्रमाणे वाटत होते. झाडाचे एकही पान हालत नव्हते.

सौ. रंजना गडेकर

२. परात्पर गुरु डॉक्टरांनी वरील सूत्र सांगितल्यावर झाडांमध्ये हालचाल जाणवू लागणे आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरांनीच त्यांच्यात प्राण घातले’, असे जाणवणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी वरील वाक्य उच्चारले आणि काही क्षणांत दृश्य पालटले. समोरील झाडांमध्ये हालचाल जाणवू लागली. नारळाच्या झाडांची पाने हालू लागली, डोलू लागली. त्यांच्या हालचालीत जिवंतपणा जाणवू लागला. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनीच त्यांच्यात प्राण घातले; म्हणून समोरची झाडे हालू-डोलू लागली’, असे मला जाणवले. ही घटना आश्चर्यकारक होती; कारण क्षणापूर्वी झाडांची काही हालचाल नव्हती. परात्पर गुरु  डॉक्टरांमुळे झाडांची हालचाल होऊ लागली आणि ‘पंचतत्त्वेही त्यांच्या आधीन आहेत’, हे लक्षात आले.

३. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या मनात विचार आल्यावर निसर्गात जिवंतपणा आला’, असे जाणवणे

देवाच्या मनात विचार आला की, सर्वकाही पालटते. जे अशक्य आहे, तेही शक्य होते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या मनात विचार आला की, निसर्ग अचेतन झाला आहे आणि त्यांच्या विचारानेच त्यात चेतना भरली अन् निसर्गात जिवंतपणा आला. ‘त्या हालचालीच्या माध्यमातून निसर्गाने त्यांना प्रतिसाद दिला आहे’, याची जाणीव झाली.’

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक