रुग्णाईत असतांना साधकाला एकांताचा कंटाळा आल्यावर त्याच्या आईने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरण दिल्यावर साधकाला साधनेचे प्रयत्न करण्याचा उत्साह येणे

श्री. धैवत वाघमारे

‘फेब्रुवारी २०२१ मध्ये मी रुग्णाईत असल्याने काही दिवस एकांतात होतो. त्या कालावधीत माझे नामजपादी उपाय करणे, व्यष्टी साधनेचे प्रयत्न करणे आणि भावसत्संग ऐकणे हे सर्व प्रतिदिन चालू होते. प्रारंभीचे ८ दिवस माझे मन त्यात रमले. ८ दिवसांनंतर मात्र ‘आता वेळ कसा वापरायचा ?

श्रीमती मेघना वाघमारे

काही सेवाही करता येत नाही. त्यामुळे एकांताचा कंटाळा आला’, असे मला वाटू लागले. ७.२.२०२१ या दिवशी माझी आई श्रीमती मेघना वाघमारे हिने लघुसंदेश पाठवून माझ्या प्रकृतीची चौकशी केली. त्या वेळी मी तिला ‘एकाच ठिकाणी राहून मला आता पुष्कळ कंटाळा आला आहे’, असे उत्तर पाठवले. काही वेळातच तिने मला लघुसंदेशाद्वारे कळवले, ‘८ दिवसांतच आपण कंटाळतो; पण स्वातंत्र्यवीर सावरकर ६ मास अंधारकोठडीत होते आणि एकटेच रहात होते. त्यांनी ते सर्व कसे सहन केले असेल ?’ हा संदेश वाचून माझा कंटाळा निघून गेला आणि मी दिवसभरातील अधिकाधिक वेळ ईश्वरचिंतनात घालवू लागलो.’ – श्री. धैवत विलास वाघमारे, गोवा (२५.२.२०२१)