आध्यात्मिक पातळीच्या परिभाषेत ‘शिष्य’ म्हणजे ६० ते ६९ टक्के पातळीचा साधक !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘साधना करतांना ६० टक्के आध्यात्मिक पातळीनंतर मनोलयाची प्रक्रिया चालू होते. या टप्प्याला साधक खर्‍या अर्थाने स्वतःला विसरून सर्वकाही गुरूंसाठी करण्याच्या प्रयत्नांत असतो. गुरूंनी सांगितलेली साधना मनापासून करणे, त्यांच्या कार्याचे दायित्व घेऊन ते पुढे नेण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे, हे या टप्प्याला जमू लागते. त्यामुळे ६० ते ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचा साधकच खर्‍या अर्थाने ‘शिष्य’ असतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.९.२०२१)