नगर जिल्ह्यातील काही गावे ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नगर, २७ सप्टेंबर – जिल्ह्यातील संगमनेर आणि पारनेर तालुक्यांतील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नाही. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील ३१ गावे, तर पारनेर तालुक्यातील १२ गावांमध्ये १४ दिवस ‘प्रतिबंधात्मक क्षेत्र’ घोषित केले असून १ ऑक्टोंबरपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हा निर्णय त्या-त्या गावांतील कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. ग्रामीण भागात नियमांचे काटेकोरपण पालन होत नसल्याचे पाहणीत आढळून येत आहे.