५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर  जन्माला आलेला कु. यदुवीर सुजय बर्गे (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील भाऊ-बहीण कु. यदुवीर सुजय बर्गे आणि कु. देवश्री सुजय बर्गे हे दोघे आहेत !

कु. यदुवीर सुजय बर्गे

पलूस, जिल्हा सांगली येथील कु. यदुवीर सुजय बर्गे (वय ६ वर्षे) याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. गर्भधारणा झाल्यावर बाळाच्या आईने (सौ. प्रियांका  बर्गे यांनी) केलेली साधना

अ. ‘गर्भ राहिल्याचे कळल्यावर सौ. प्रियांकाने श्रीकृष्णाच्या मूर्तीवर जलाचा अभिषेक करून ते तीर्थ प्रतिदिन न चुकता घेण्यास आरंभ केला.

आ. गणपतीला प्रतिदिन २१ दुर्वांची जुडी वाहिली आणि संकष्टीला २१ जुड्या वाहिल्या.

इ. श्री गुरुचरित्राचे पारायण केले.

२. बाळाच्या जन्मानंतर

२ अ. जन्म ते १ वर्ष

१. बाळाचा जन्म झाल्यावर परिचारिकेने (नर्सने) बाळाला माझ्याकडे (कु. शिल्पा बर्गे यांच्याकडे) दिल्यावर मी त्याच्या कानात जयघोष केला, तसेच कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप ऐकवला. तेव्हा त्याने डोळे उघडून तो ऐकला.

२. बाळाच्या दोन्ही हातांच्या बोटांची, अंगठा आणि तर्जनी यांची मुद्रा केलेली होती.

३. बाळाने जन्मानंतर ४ थ्या दिवशी त्याची आत्या सौ. शीतल माने हिच्याकडे बघून हुंकार दिला.

४. यदुवीर ९ मासांचा असतांना त्याला ‘गॅस्ट्रो’ची लागण झाली होती. त्यामुळे त्याला ४ दिवस रुग्णालयात ठेवले होते. त्या वेळी रुग्णालयातील अन्य रुग्ण-बालके त्यांच्या पालकांना पुष्कळ त्रास होती; मात्र यदुवीरने विशेष त्रास दिला नाही.

२ आ. १ ते ३ वर्षे

२ आ १. धर्मप्रेम : बाहेर कुठे भगवा ध्वज दिसला, तर यदुवीरला पुष्कळ आनंद व्हायचा आणि तो ‘महाराज’, ‘महाराज’, असे म्हणायचा. त्याला पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आदर आणि प्रेम आहे. दूरचित्रवाणीवर शिवरायांची मालिका लागल्यावर तो सर्वांना बघण्यासाठी बोलवायचा.

२ आ २. मोहक सौंदर्य आणि लाघवी बोलणे : एकदा यदुवीरची श्रीकृष्णाप्रमाणे वेशभूषा करून त्याची छायाचित्रे काढली. तेव्हा तो कृष्णासमानच भासत होता. तो खोडकर आणि नटखट आहे. त्याच्या खोड्या पाहिल्यावर ‘श्रीकृष्ण असाच खोड्या करत असणार’, असा विचार मनात येतो. त्याचे बोलणे अतिशय गोड आणि लाघवी आहे. त्याचे बोलणे ऐकून लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. तो १ वर्षाचा असतांना औदुंबर येथे आम्ही श्री दत्तगुरूंची महापूजा केली होती. त्या वेळी मंडपात अन्य काही लोक होते. यदुवीरचे बोलणे ऐकून तेथील महिलांनी त्याला जवळ बोलावले. यदुवीरही काही वेळ त्यांच्याजवळ बसला.

२ इ. ३ ते ४ वर्षे

सौ. सत्त्वशीला बर्गे

२ इ १. व्यवस्थितपणा : यदुवीर खेळून झाल्यावर घेतलेली खेळणी त्याच्या कप्प्यात ठेवून कप्प्याचे दार व्यवस्थित बंद करतो.

२ इ २. धर्माचरण करणे : यदुवीरला कपाळावर कुंकवाने नाम काढून घ्यायला पुष्कळ आवडते. तो शाळेत किंवा बाहेर जातांना नाम ओढूनच जातो.

२ इ ३. देवतांच्या मालिका आवडणे : त्याला दूरचित्रवाणीवरील देवतांच्या मालिका, उदा. विठूमाऊली, बाळूमामा या मालिका पहायला पुष्कळ आवडते.

२ इ ४. उपायांचे महत्त्व ठाऊक असणे : यदुवीरला काही त्रास व्हायला लागल्यास तो आध्यात्मिक उपाय करायला सांगतो.

२ इ ५. प्रगल्भ बुद्धिमत्ता : यदुवीरला सर्व नाती समजतात. तो बोलतांना कधीही चुकीचे नाते सांगत नाही.

२ इ ६. जिज्ञासू वृत्ती : एवढा लहान असूनही यदुवीर सांगितलेले सर्व एकाग्रतेने ऐकतो आणि त्यासंबंधी प्रश्न विचारतो. त्याने भगवान शंकराचे चित्र बघून ‘शिवाच्या अंगावर एवढे साप का आहेत ? शिवाने खाली बसायला काय घेतले आहे ?’, तसेच भगवान श्रीकृष्णाचे चित्र पाहिल्यावर ‘त्याच्या कंबरेला काय आहे ?’ असे प्रश्न विचारतो. त्याला उत्तर दिल्यावर त्याचे समाधान होते.

३. यदुवीरचे स्वभावदोष : स्वत:च्या वस्तू इतरांना न देणे आणि राग येणे.’ – वैद्या कु. शिल्पा बर्गे (चि. यदुवीरची आत्या) आणि

सौ. सत्त्वशीला बर्गे (चि. यदुवीरची आजी), पलूस, जि. सांगली. (२७.६.२०१९)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता