भाजप पश्चिम मंडलाच्या वतीने रोगनिदान शिबिर !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सांगली, २७ सप्टेंबर (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतात ‘सेवा सप्ताह’ चालू आहे. त्यानिमित्ताने भाजप पश्चिम मंडल आणि ‘सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज’ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ सप्टेंबर या दिवशी टिळक स्मारक मंदिर येथे सर्वरोग निदान आणि उपचार शिबिर घेण्यात आले. भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिरास प्रारंभ करण्यात आला. या शिबिराचे नियोजन भाजप पश्चिम मंडल अध्यक्ष दीपक कर्वे, युवा मोर्चा सरचिटणीस प्रथमेश वैद्य, सचिव शांतिनाथ कर्वे, अनिकेत खिलारे यांनी केले. या प्रसंगी भाजप शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, दीपक माने, केदार खाडिलकर, श्रीकांत शिंदे, पृथ्वीराज पवार, डॉ. भालचंद्र साठ्ये, भाजप पदाधिकारी अविनाश मोहिते, उदय बेलवलकर यांसह अन्य उपस्थित होते.