कारागृहामधील आरोपीने पत्नीला ३३ चिठ्ठ्या पाठवल्या !

कारागृहामध्ये असे प्रकार कसे होतात ? याकडे लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी.

पुणे – सदनिकेच्या व्यवहारासाठी ७ लाख रुपये दिल्यानंतर त्याबदल्यात २५ लाख रुपये वसूल करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेल्या आरोपीने पत्नीला ३३ चिठ्ठ्या पाठवल्या, तसेच आरोपी कारागृहात अवैधरित्या भ्रमणभाष संचाचा उपयोग करून त्याच्या पत्नीस संदेश करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सागर रजपूत असे आरोपीचे नाव असून त्याची बहीण राणी मारणे ही सागर रजपूत यांच्या पत्नीच्या भ्रमणभाषवरून त्याच्या संपर्कात राहून त्याच्या सांगण्याप्रमाणे कृती करून रजपूत यांना साहाय्य करत होती. आरोपीचे निरोप बाहेरील लोकांना देणे, भेटणे, वस्तू पोचवणे, धमकावणे, संबंधितांना रकमा पुरवणे अशा प्रकारची कामे करून राणी मारणे ही साहाय्य करत असल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे.