आता बारामतीतही वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर ‘इंटरसेप्टर’ वाहनाच्या साहाय्याने दंडात्मक कारवाई !

  • मूल्यशिक्षणामुळे नागरिक स्वयंशिस्त पाळण्यास प्रवृत्त होऊ शकतात !
  • दंडात्मक कारवाईमुळे वाहनचालकांना शिस्त लागण्यास निश्चितच साहाय्य होईल; त्याचसमवेत यातूनही भ्रष्टाचाराच्या नवीन संधी निर्माण होणार नाहीत ना, हेही पहावे लागेल !

बारामती – येथे वाहतुकीचे नियम मोडणार्‍या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. आता बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागही ‘इंटरसेप्टर’ वाहनाच्या साहाय्याने गतीचे उल्लंघन, मद्यपान करून वाहन चालवणे, काळ्या काचा असलेली वाहने असणे अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करणार आहे. याद्वारे वाहनचालकाच्या भ्रमणभाषवर कोणत्या दिवशी कोणत्या ठिकाणी कोणता नियम मोडला याची माहिती छायाचित्रांसह दिली जात असल्याने वाहनचालकांची दंड भरण्यापासून सुटका होत नाही. महाट्रॅफिक या ‘ॲप’वर वाहनाची नोंदणी केल्यानंतरही ‘ई-चलन’ हा पर्याय निवडल्यावर वाहनावर दंड आहे किंवा नाही याची माहिती मिळत आहे.