आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर का काढले नाही ?

‘वर्ष १९८० पासून सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या सरकारांनी स्वतःच्या हीन आणि स्वातंत्र्यमूल्यद्रोही कृत्यांनी गोव्याची सांस्कृतिक मूल्ये अन् या देवभूमीची सोज्वळ आणि आध्यात्मिक प्रतिमा यांच्याशी, तसेच भारतीय संस्कृतीशी अक्षम्य अन् किळसवाणा द्रोह केला आहे ! ज्या असंख्य सर्वधर्मीय स्वातंत्र्यसैनिकांनी ऐन तारुण्य, संसारसुख, कुटुंब, स्वतःचे भवितव्य सगळेच पणाला लावून, शत्रू पोर्तुगिजांच्या गुलामीतून गोवा मुक्त करण्यासाठी प्रसंगी प्राणांचे बलीदान दिले, त्यांचा त्याग आणि स्वातंत्र्यमूल्य आकांक्षा यांचा पार चुराडा अन् घोर अपमान आतापर्यंतच्या सत्तांनी केलेला आहे ! १९ डिसेंबर १९६१ या दिवशी भारतीय सैन्याने गोवा मुक्त केला. आपण सर्व स्वतःलाच आधी एक प्रश्न विचारू आणि त्याचे प्रामाणिक उत्तर शोधू. (यासंदर्भातील ३ आणि ४ ही सूत्रे आपण २९.८.२०२१ या दिवशीच्या अंकात पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

प्रा. सुभाष वेलिंगकर

५. रस्ते आणि गावे यांची पोर्तुगिजांनी ठेवलेली नावे अन् अपभ्रंश केलेले ‘स्पेलिंग्स’ आणि उच्चार जसेच्या तसे ठेवले गेले आहेत.

६. काँग्रेसच्या राजवटीत पर्यटनाचे निमित्त करून गोव्याची प्रतिमा ‘पूर्वेकडील रोम’ (रोम ऑफ द ईस्ट) अशी हेतूपुरस्सर करण्यात आली. काँग्रेसने पहिला कॅसिनो गोव्यात आणला. भाजपने त्यांची संख्या वाढवून ती ६ वर आणली. याखेरीज कॅसिनो ‘ऑफशोअर’ (समुद्राच्या बाहेर) असतांनाही त्यांना मांडवी नदीत कायमचा स्थिर कायदेशीर दर्जा दिला.’

(क्रमशः पुढील रविवारी)

– प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारतमाता की जय’ संघटना, गोवा.