वर्ष २०२० मधील गुरुपौर्णिमेच्या दिवशी दाखवण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाच्या वेळी काणकोण (गोवा) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती

१. सौ. सुप्रिया काणकोणकर

अ. ‘गुरुपौर्णिमेच्या वेळी दाखवण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमातील पूजाविधी आणि सर्व कार्यक्रम पाहून माझी भावजागृती झाली.

आ. मला दोन वेळा सुगंधाची अनुभूती आली.

इ. गुरुकृपेने दिवसभर मी आनंदावस्थेत होते आणि शांती अनुभवत होते.’

२. सौ. सविता अनिल देसाई

अ. ‘घरातील सभागृहात आदल्या दिवसापासून गुरुपौर्णिमा महोत्सवाची सिद्धता करतांना ‘प्रत्येक कृती भावपूर्ण होत आहे’, असे मला कुणीतरी सांगत आहे’, असे मला वाटले.

आ. ‘गुरुपौर्णिमेच्या सर्व सेवा गुरुसेवकांच्या समवेत करत आहे’, असा भाव ठेवल्याने मला सगळीकडे गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते.

इ. संगणकाभोवती मला पिवळ्या आणि निळ्या प्रकाशाची वलये दिसली.’

३. सौ. शैला देसाई

अ. ‘गुरुपौर्णिमेचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम चालू झाल्यावर ‘आम्ही सर्व जण रामनाथी आश्रमातच बसलो आहोत’, असे मला जाणवले. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ पूजाविधी करत आहेत आणि आम्ही त्यांच्या समोर बसून सर्व अनुभवत आहोत’, असे मला वाटत होते.

आ. सद्गुरु (कु.) स्वाती खाडयेताईंचे प्रवचन ऐकतांना ‘आम्ही विष्णुलोकात आहोत’, असे मला वाटले.

इ. ‘आपत्कालीन परिस्थिती समोर दिसत असून आम्ही साधक तिला सामोरे जात आहोत आणि साक्षात् गुरुदेव साहाय्याचा हात देऊन आम्हा साधकांना पुढे पुढे घेऊन जात आहेत’, असे मला दिसले.’ (२९.९.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक